मिरज-बेडग रस्त्यावर सुगंधी तंबाखू साठा जप्त:. मिरज ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

मिरज- बेडग रस्त्यावर
कर्नाटकातून बेकायदा सुगंधी तंबाखू व गुटखा वाहतूक करणारी गाडी पकडून ग्रामीण पोलिसांनी तंबाखू व गुटख्याचा साठा व वाहन असा १६ लाखांचा ऐवज जप्त केलाआहे याबाबतीत पोलिसांच्या कडून मिळाली माहिती अशी की, संकेत शिवाजी चव्हाण ,वय २०, रा. रत्नागिरी हा मंगसुळी येथून नंबरप्लेट नसलेल्या गाडीतून बेकायदा गुटखा व सुगंधी तंबाखू चोरून विक्रीसाठी मिरजमार्गे रत्नागिरीला जात असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. बेडग आडवा रस्ता येथे कर्नाटकातून येणाऱ्या वाहनाची तपासणी सुरू केल्यानंतर काळया रंगाची नंबर नसलेली गाडी बेडगकडून येताना सापडली. वाहन चालक संकेत शिवाजी चव्हाण याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना व वाहनाची कागदपत्रे नव्हती. संकेत चव्हाणने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गुरव यांनी त्याची झडती घेतली असता गाडीत ६० हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधी तंबाखू व गुटखा साठा सापडला. मंगसुळी येथील एका व्यक्तीचा तंबाखू व गुटखा साठा घेऊन रत्नागिरी येथे जात असल्याची चव्हाण याने कबुली दिली. अवैध गुटखा साठा, लाखाचा आयफोन, १५ लाखांची गाडी जप्त करून संकेत चव्हाण याच्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करत त्याला अटक केलेली आहे अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करीत आहेत